
आतंरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष-२०२३ निमित्त रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे १९ ते २१ मे २०२३ या कालावधीत केंद्र सरकारच्या वतीने मल्टी मिडीया प्रदर्शनाचे आयोजन
श्रीवर्धन, दि. १८: केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत केंद्रीय संचार ब्यूरो, प्रादेशिक कार्यालय पुणे, महाराष्ट्र शासनाचे विविध विभाग आणि नगरपरिषद श्रीवर्धन, जिल्हा रायगड यांच्या सहकार्याने श्रीवर्धन येथील समुद्र किना-यावर १९ ते २१ मे २०२३ या कालावधीत आंतरराष्ट्रीय भरड धान्य (पौष्टीक तृणधान्य) वर्ष २०२३ निमित्त मल्टिमीडीया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या पौष्टीक भरड धान्याच्या आहारातील महत्वाविषयी जनजागृती करण्यासाठी या मल्टीमिडीया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्र संघाने २०२३ हे वर्षे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणूण साजरे करण्याची घोषणा केली आहे. मानवी शरीराला लागणारे पोषक घटक पुरवणारे अन्न म्हणून या धान्यांकडे बघितले जाते. या तृणधान्यांमध्ये ज्वारी, बाजरी,नाचणी, राळा, वरई, कोदो, कुटकी,सावा, कूट्टु व राजगिरा या दहा धान्यांचा समावेश होतो. या भरडधान्यांना सुपरफूड म्हटले जाते.
या प्रदर्शनाचे उद्घाटन उद्या दिनांक १९ मे, २०२३ रोजी सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार असून यावेळी अमित शेडगे, उपविभागीय अधिकारी, प्रशांत स्वामी, उपविभागीय पोलीस अधिकारी, विराज लबडे, मुख्याधिकारी, नगर परिषद, महेंद्र वाकळेकर, तहसिलदार, गजानंन लेंडी, गट विकास अधिकारी, उत्तम रिकामे, पोलीस निरीक्षक डी. एल. कुंभार, तालूका कृषी अधिकारी, संदीप वाजंळे, तालुका क्रीडाधिकारी, अमिता भायदे, बालविकास सेवा अधिकारी, प्रणय ठाकूर, अभियंता नगर परिषद, क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी पी. फणीकुमार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शासनाच्या विविध योजना तसेत पौष्टीक तृणधान्यांची माहिती देण्यासाठी विविध शासकीय विभागांतर्फे स्टाल्स् उभारण्यात येणार आहेत. या कालावधीत नागरिक आणि पर्यटकांसाठी यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शन सर्वांसाठी मोफत खुले असून या प्रदर्शनाला सर्व नागरिक तसेच पर्यटकांनी भेट द्यावी असे आवाहऩ केंद्र सरकार तसेत राज्य शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.