Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“माझं नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे”: राहुल यांचं वीर सावरकरांबाबत वादग्रस्त विधान

“माझं नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे”: राहुल यांचं वीर सावरकरांबाबत वादग्रस्त विधान

नवी दिल्ली: दिल्लीच्या रामलीला मैदानावर आयोजित रॅली मध्ये पहिल्यांदाच सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी एकत्र आलेले दिसले. यावेळी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर त्यांनी टीका केली. दोन दिवसांपूर्वीच देशात घडणाऱ्या बलात्कारांसंबंधी सत्ताधारी भाजपवर राहुल यांनी एका सभेत टीका केली होती. त्यांनी पंतप्रधान मोदी यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या “मेक इन इंडिया” चा संदर्भ घेत “रेप इन इंडिया” म्हटले होते. यावर काल मोठा गदारोळ झाला होता. भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी त्यांना देशाची माफी मागायला सांगितली होती.

आजच्या रामलीला मैदानावरील आपल्या भाषणात ते म्हणाले कि माझ्या “रेप इन इंडिया” या वक्तव्याबाबत माफी मागणार नाही. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख करत वादग्रस्त विधान केले कि “माझं नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. माफी मोदींनी मागायला हवी. त्यांनी व त्यांचे सहकारी अमित शाह यांनी देशाची माफी मागायला हवी.” या विधानानंतर देशभर विशेषतः महाराष्ट्रात सावरकर प्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली. अनेकांनी त्यांना ट्रोलही केले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *