मला एक घाबरलेला पंतप्रधान दिसत आहे; राहुल गांधी यांची मोदींवर खोचक टीका
राहुल गांधी यांनी आज (दि.४) पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, “अर्ध्यापेक्षा जास्त मतदान पूर्ण झालं आहे आणि स्पष्ट आहे की मोदी हरत आहेत. मुख्य मुद्दे रोजगार, शेतकरी, पंतप्रधानां चा भ्रष्टाचार, देशाच्या सार्वभौम संस्थांवर हल्ले हे आहेत. आमचा पोलिंग रिपोर्ट सरळपणे दाखवतंय की भाजप हरत आहे.”
पुढे राहुल असेही म्हणाले की, “सेना, वायुसेना आणि नौसेना ही पंतप्रधान मोदींची वैयक्तिक संपत्ती नाहीये. ते जेव्हा म्हणतात की युपीए च्या वेळेला सर्जिकल स्ट्राईक फक्त व्हिडीओ गेम मध्ये झालं, असं म्हणणं म्हणजे काँग्रेस चा नव्हे तर भारतीय सेनेचा अपमान आहे.
राहुल गांधी यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे:
१) राफेल च्या विषयात चौकीदाराने ३० हजार कोटी चोरी केले आहेत.
२) देशाची जनता विचारू इच्छिते की मोदीजी बेरोजगारीच्या अश्वासनाच काय झालं?
३) नरेंद्र मोदी निवडणुका हरत आहेत, आणि ते त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय.
४) नरेंद्र मोदी यांनी डीमोनेटायझेशन केलं आम्ही रिमोनेटाइझ करण्यासाठी (NYAY) न्याय योजना आणली आहे.
५) आमचं पाहिलं लक्ष मोदींना हरवण्याचं आहे.
६) मला भाजप ची कोणतीच मोहीम दिसत नाही. मला एक घाबरलेला पंतप्रधान दिसत आहे. ज्यांना वाटतं की ते निवडणूका जिंकतील. ते माझ्या प्रश्नांपासून दूर पळतात.
आजच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका अर्थाने डीवचण्याचाच प्रयत्न केला आहे.
