Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

Video पहा : ऐका महावितरणच्या भोंगळ व संशयास्पद कारभाराच्या तक्रारिचा पाढा थेट लोकांच्या तोंडून

Featured Video Play Icon

Video पहा : महावितरणच्या भोंगळ व संशयास्पद कारभाराच्या तक्रारिचा पाढा थेट लोकांच्या तोंडून

पनवेल: निवडणुकांचा हंगाम किमान महाराष्ट्रापुरता का असेना सध्या संपलेला आहे. त्यामुळे आता प्रशासनाला लोकांच्या समस्यांकडे बघायला वेळ मिळेल असे आपण मनू शकतो. गेल्या भागात आपण पाहिलंत कि आम्ही महावितरणच्या भिंगारी, पनवेल येथील कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांना नेरे विभागातील नागरिकांच्या समस्यांसंदर्भात प्रश्न विचारण्यासाठी गेलो होतो. आपण तेव्हा पाहीलतच कि येथील अधिकारी ‘यमगर’ हे आम्हाला कशा प्रकारे टाळत होते. येत्या काही दिवसात आपण लोकांच्या समस्या थेट त्यांच्याच तोंडून ऐकणार आहोत. जेणे करून त्याची दखल प्रशासन, संबंधित खात्याचे मंत्री, विरोधीपक्षनेते घेतील आणि संशयास्पद कारभार करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोकरीतून कायमची गच्छंती होईल. या आठवड्यात नेरे येथील रहिवासी श्री. मनोहर दळवी हे आपल्यासमोर त्यांना व त्यांच्या वसाहतीतील नागरिकांच्या समस्यांचा पाढा आपल्यासमोर मांडणार आहेत. अशाच महावितरण संदर्भातल्या आपल्या तक्रारीं संदर्भात असलेली माहिती, विडिओ आपण आम्हाला ९३७२२३६३३२ या क्रमांकावर व्हाट्सअँप द्वारे पाठवू शकता. या उपक्रमाला लाभलेल्या आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल टीम महाराष्ट्र वार्ता आपली आभारी आहे. धन्यवाद.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *