Breaking News: निलेश राणे यांचा राहुल गांधी यांना आपुलकीचा सल्ला
मुंबई: गेले दोन दिवस दिल्लीत राहुल गांधी आणि काँग्रेस कमिटी यांच्यात राजीनामा नाट्य चालू आहे. राहुल गांधी यांनी जेव्हा आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा काँग्रेस च्या कार्यकारी समितीसमोर ठेवला तेव्हा तो तात्काळ फेटाळण्यात आला. पण अजूनही राहुल गांधी आपल्या राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे कळते. त्यांनी समितीला एक महिन्याचा अवधी दिला आहे, या काळात त्यांनी नवीन अध्यक्ष शोधावा असे ते म्हणाले आहेत.
या साऱ्या नाट्यामुळे काँग्रेस चे देशभरातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या चिंतेत आहेत. पण आज नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे हेही राहुल गांधींच्या निर्णयामुळे चिंतेत असल्याचे कळल्यावर सर्वांच्या भुवया वर आल्या आहेत. थोड्याच वेळापूर्वी त्यांनी एक ट्विट करत राहुल गांधी यांना एक आपुलकीचा सल्ला दिला आहे. ते आपल्या ट्विट मध्ये राहुल गांधींना उद्देशून म्हणालेत की, “मीडिया च्या जाळ्यात अडकू नका…अध्यक्ष राहून परिस्थिती बदला …नाहीतरी काँग्रेसमध्ये कोणी कोणाचं ऐकत नाही आणि त्यावर बाहेरचा कोणी अध्यक्ष झाला की जत्राच लागेल.”
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून विनायक राऊत यांच्याकडून पराभूत झाल्यामुळे निलेश राणे आता कोणती भूमिका घेतात या कडे सर्वांचं लक्ष लागून होतं. पण आता राहुल गांधी यांना त्यांनी जो सहानभूतीपूर्वक मित्रत्वाचा सल्ला दिलाय तो बरंच काही बोलून जातोय.
मीडिया च्या जाळ्यात अडकू नका… अध्यक्ष राहून परिस्थिती बदला… नाहीतरी काँग्रेसमध्ये कोणी कोणाचं ऐकत नाही आणि त्या वर बाहेरचा कोण अध्यक्ष झाला की जत्राच लागेल. https://t.co/8q01gTjJ6b
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 28, 2019
