पुणे, दि. २: अपेक्षेप्रमाणे थोड्या वेळापूर्वी पुण्यात जिल्हाधिकार्यांमार्फत मिनी ‘लॉकडाऊन’ची घोषणा करण्यात आली आहे. जाणून घ्या नेमक्या आटी व नियम.
१) पुण्यात संध्याकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत असणार संचारबंदी
२) या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद राहतील
३) हॉटेल्स, रेस्टोरंट व बार पुढील सात दिवस बंद राहतील
४) पण होम डिलिव्हरी सेवा सुरू राहतील
५) आठवडी बाजारही ७ दिवस बंद
६) लग्नासाठी ५० आणि अंत्यसंस्कारासाठी २० लोकांना राहील परवानगी
७) याशिवाय दिवसभर जमावबंदी लागू असेल
८) पालिकेची ‘पीएमपीएमएल’ बस सेवाही पुढील सात दिवसांसाठी राहील बंद
९) वरील सर्व निर्बंध पुणे शहर, पिंपरी चिंचवड पालिकेसह सबंध जिल्हयासाठी लागू राहतील