Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

विवाहाच्या माध्यमातून बळजबरीनं धर्मांतर केल्यास गुजरात मध्ये होऊ शकते ‘एवढ्या’ वर्षांची शिक्षा

शिक्षेची तरतूद करणारं विधेयक गुजरात विधानसभेत मंजूर

गुजरात: गुजरात विधानसभेनं काल गुजरात धार्मिक स्वातंत्र्य दुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली. विवाहाच्या माध्यमातून बळजबरीनं धर्मांतर केल्यास शिक्षेची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. अपराध सिद्ध झाल्यास दोषी व्यक्तीला 3 ते 10 वर्षांचा तुरुंगवास आणि पाच लाख रुपयांचा दंड होऊ शकतो.
धर्मांतराच्या उद्देशानं महिलांना फसवून त्यांच्याशी विवाह करण्याच्या  प्रकारांना आळा घालण्यासाठी आधीच्या कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे. बळजबरीच्या धर्मांतराला विरोध करणारे अशा प्रकारचे कायदे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सरकारनं आधीच संमत केले आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *