Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पुणे शहरात कोविड बाधितांच्या आकड्यात मागील १० दिवसांपासून लक्षणीय वाढ

पुणे शहरात कोविड बाधितांच्या आकड्यात मागील १० दिवसांपासून लक्षणीय वाढ

पुणे: कोरोनाची लाट गेली असे वाटत असतानाच गेल्या दहा दिवसांपासून पुणे शहरात कोरोनाच्या नवीन बाधितांचा आकडा लक्षणीय वाढत असला, तरी त्यांच्यात सौम्य लक्षणे असलेल्यांचे प्रमाण सुमारे ९५ टक्के आहे. त्यामुळे बहुतांश बाधित घरीच विलगीकरणात आहेत, असं आरोग्य विभागाने म्हटले आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून विलगीकरण कक्ष, तसेच नव्या बाधितांसाठी खाटा वाढवल्या जात आहेत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईफ च्या माध्यमातून राज्यातील जनतेला लॉकडाऊन न होण्यासाठी नियमांचे पालन करावे यासाठी पुढील ८ दिवसांची मुदत दिली आहे हे विशेष.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *