बघा जैश ए मोहम्मद चा दहशतवादी अहमद तांत्रेने केला कोणता खुलासा
जैश-ए-मोहम्मद संघटनेचा सदस्य निसार अहमद तांत्रे याने चौकशीदरम्यान पुलवामा हल्ल्याबाबत खळबळजनक माहिती दिली आहे. पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या आत्मघाती हल्ल्याची आपल्याला माहिती होती, अशी कबुली त्याने दिली आहे. यावरून पुलवामा हल्ल्यामागे पाकिस्तानस्थित जैश संघटनाच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
निसार अहमद तांत्रे याला आठवड्याभरापूर्वी युएईने भारताकडे सोपवले होते. त्याची सध्या राष्ट्रीय तपास पथकाकडून चौकशी करण्यात येत आहे. ‘जैश’ च्या आदेशानुसारच पुलवामाचा हल्ला झाला होता. त्याचबरोबर खान हीच ती व्यक्ती आहे की, ज्याने या हल्ल्याचे नेतृत्व करीत तो घडवून आणला होता याला तांत्रेने दुजोरा दिला आहे. तपास पथकांना आपल्या गुप्तचरांची माहिती आणि खालच्या स्तरावरील दहशतवाद्यांच्या चौकशीवरच तपास अवलंबून होता. निसार अहमद तांत्रेने चौकशीदरम्यान दिलेली ही माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
तांत्रे हा जैशच्या मारल्या गेलेल्या नूर अहमद याचा भाऊ आहे. तो याचवर्षी १ फेब्रुवारी रोजी भारतातून पळून गेला होता. काश्मीर खोऱ्यात ‘जैश’च्या कार्यकर्त्यांवर याचा महत्वाचा प्रभाव असल्याचे गुप्तचर यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
काश्मीर खोऱ्यात ‘जैश’ च्या कार्यकर्त्यांवर तांत्रेचा प्रभाव असल्याचे गुप्तचर यंत्रणेतील एका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. खानने त्याला सोशल मीडिया अॅपच्या माध्यमातून पुलवामा हल्ल्याच्या कटाची माहिती दिली होती. खानने म्हटले होते की, फेब्रुवारी मध्ये पुलवामात तो अनेक मोठे स्फोट घडवून आणणार आहे. त्याचबरोबर खानने तांत्रेकडून या हल्ल्यासाठी नियोजन आणि तो प्रत्यक्ष घडवून आणण्यासाठी मदत मागितली असल्याची माहिती तांत्रेने चौकशी दरम्यान दिली आहे. ‘जैश’चा निसार अहमद तांत्रे हा दहशतवादी जम्मू-काश्मीरमधील लेथपोरा येथे सीआरपीएफच्या तळावर डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. ३० आणि ३१ डिसेंबरच्या रात्री झालेल्या या हल्ल्यात सीआरपीएफचे पाच जवान शहीद झाले होते. तर जैशच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.
