SHIVSENA-DADAR-FINAL
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ दादर येथे शिवसैनिकांनी जाळला पाकिस्तानचा ध्वज
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी संघटनेने हल्ल्या केल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ काल सायंकाळी दादरमध्ये शिवसेना कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. दादर पश्चिमेला रेल्वे स्थानक बाहेरील कविवर्य केशवसुत उडाण पुलाखाली शिवसेना विभाग क्र. १० तर्फे पाकिस्तानचा ध्वज जाळून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. या प्रसंगी पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
