पुलवामा हल्ल्यातील शहीदांना पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली
पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी २०१९ मध्ये आजच्या दिवशी पुलवामामध्ये हौतात्म्य पत्कारलेल्या सर्वांना श्रद्धांजली वाहिली आहे आणि त्यांनी आपल्या देशासाठी केलेल्या उत्कृष्ट सेवेचे स्मरण केले आहे.
ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“२०१९ मध्ये याच दिवशी पुलवामामध्ये शहीद झालेल्या सर्वांना मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपल्या देशासाठी त्यांनी केलेल्या उत्कृष्ट सेवेचे स्मरण करतो. त्यांचे शौर्य आणि सर्वोच्च हौतात्म्य प्रत्येक भारतीयाला आपल्या देशाला सशक्त आणि समृद्ध कार्य करण्यास प्रेरित करेल.”
