Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

भारताचे कोळसा उत्पादन ६.१३% ने वाढून जानेवारी २०२२ मध्ये ७ कोटी ९६ लाख टनांवर पोचले

कंपन्यांच्या मालकीच्या कोळसा खाणींनी उत्पादनात ४५ टक्के वाढ नोंदवली

कोळशावर आधारित उर्जा निर्मिती जानेवारीत ९.२ टक्क्यांनी वाढली

मुंबई, दि. १४: भारताचे कोळसा उत्पादन ६.१३% ने वाढून जानेवारी २०२२ मध्ये ७ कोटी ९६ लाख टनांवर पोचले आहे. जानेवारी २०२० मध्ये ते ७ कोटी ५० लाख टन होते. कोळसा मंत्रालयाने दिलेल्या तात्पुरत्या माहितीवरून यावर्षी जानेवारीत झालेल्या एकूण कोळसा उत्पादनापैकी, कोल इंडिया लिमिटेडने (CIL) कोळसा उत्पादनात २.३५% वाढ करत ६ कोटी ४५ लाख टन कोळसा उत्पादन केले आहे. सिंगरेनि कोलेरीज लिमिटेडने (SCCL) ६ कोटी ३ लाख टन कोळसा उत्पादन घेत उत्पादनात ५.४२% ची वाढ नोंदवली आहे. या कालावधीत कंपन्यांच्या मालकीच्या खाणींनी कोळसा उत्पादनात ४४.९१% एवढी वाढ नोंदवत ९ कोटी ७ लाख टन कोळसा उत्पादन नोंदवले.

सर्वात महत्वाच्या ३५ कोळसा खाणींपैकी १४ कोळसा खाणींनी १०० टक्क्यांहून अधिक चांगली कामगिरी केली आणि इतर सहा खाणींनीही ८० ते १०० टक्के कामगिरी बजावली. जानेवारी २०२०च्या तुलनेत जानेवारी २०२२ मध्ये उर्जासंबधित कामांसाठी पाठवलेल्या कोळशाचे प्रमाण १८.७०% नी वाढून ६३.२२ MT वर पोचले. जानेवारी २०२० मध्ये ते ५ कोटी ३२ लाख ६० हजार टन होते.

जानेवारी २०२० च्या तुलनेत कोळशावर आधारित उर्जा निर्मितीने ९.२१%ची वाढ नोंदवली. जानेवारी २०२२ मध्ये एकूण उर्जा उत्पादन जानेवारी २०२० च्या तुलनेत ६.६९% हून अधिक होते. कोविड महामारीमुळे आर्थिक वर्ष २०२१ हे असाधारण वर्ष मानले असल्यामुळे आर्थिक वर्ष २०२२ मधील कोळसा उत्पादनाची तुलना आर्थिक वर्ष २०२० मधील कोळसा उत्पादनाशी करण्यात आली आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *