शिवसेना प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी आणि नगरसेविका शीतल म्हात्रे यांना जीवे मारण्याची धमकी
मुंबई: शिवसेना प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी आणि मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका आणि विधी व महसूल विभागाच्या अध्यक्षा शीतल म्हात्रे यांनी ट्विटर द्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आशिष केआर द्विवेदी या नावाने सदर व्यक्तीचे ट्विटर अकाउंट असून यावरून त्याने अपशब्द वापरात “तुला गोळी नाही मारली तर लक्षात ठेव” असे म्हणत धमकी दिली आहे.
यानंतर शीतल म्हात्रे यांनी बोरिवलीतील एमएचबी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांनी ५०६ कालामांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू आहे.
