सायन हॉस्पिटल प्रकरण भोवलं? आयुक्त प्रवीण परदेशी यांची बदली, इक्बाल सिंग चहल नवे मनपा आयुक्त
मुंबई: मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावरून प्रवीण परदेशी यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी UDD चे प्रधान सचिव इकबाल चहल यांची आयुक्तपदी वर्णी लागली आहे. तर ठाणे महापालिकेचे माजी आयुक्त संजीव जयस्वाल यांची मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. प्रवीण परदेशी आता नगरविकास खात्याचे सचिव म्हणून काम पाहणार आहेत.
१९८५ च्या बॅचचे आय.ए.एस. असलेले प्रवीण परदेशी राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या खास मार्जितले मानले जातात. मुंबईत कोरोना ग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी सायन इस्पितळातील एक व्हिडिओ प्रसारित झाला होता. यात मृतदेहांच्या बाजूला कोरोना बाधित रुग्णांवर उपचार चालू होते. असे मानले जाते की याच कारणामुळे प्रशासकीय यंत्रणेचे प्रमुख म्हणून त्यांची बदली करण्यात आली आहे.
