Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा देणार विरार मधील ठाकूर परिवाराला आव्हान?

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा देणार विरार मधील ठाकूर परिवाराला आव्हान?

मुंबई/नालासोपारा: एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून प्रसिद्ध पावलेले पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी ४ जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा वरिष्ठांकडे सुपूर्द केला होता. दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला असून, ते पुढील २ दिवसात शिवसेनेत दाखल होऊ शकतात असे खात्रीलायक सूत्रांकडून कळते. नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून ते बहुजन विकास आघाडीचे विद्यमान आमदार क्षितिज ठाकूर यांच्या विरोधात येत्या निवडणुकीत उभे राहणार असल्याचे कळते. जर असे झाले तर या परिसरात असलेल्या ठाकूर परिवारासाठी ते मोठे आव्हान ठरेल.

आपल्या वादळी कारकीर्दीने गाजलेल्या प्रदीप शर्मा यांनी १०० पेक्षा जास्त गुन्हेगारांचा आपल्या कार्यकाळात खात्मा केला. परंतु लखन भैय्या बनावट चकमक प्रकरण आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम शी संबंध या आरोपांमुळे त्यांच्या वर्दीवर शिंतोडे उडाले होते. पण या दोन्ही प्रकरणांतून ते निष्कलंकपणे सहीसलामत बाहेर सुटले. आता नव्या राजकीय इनिंगमध्ये ते कशा प्रकारे वाटचाल करतात हे पाहणे औत्सुक्याचे राहील.

 

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *