Maharashtra Police cap
राज्यातील पोलिसांच्या टोपीत पुन्हा बदल, पहा ती टोपी
राज्यातील पोलीस दलातील सहायक पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस शिपाई यांच्या गणवेशात अतिरिक्त टोपीचा समावेश करण्यात आला आहे. पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल यांनी हा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल यांनी या अतिरिक्त टोपीचा समावेश पोलीस गणवेशात करत असल्याचे पत्रक सर्व पोलीस आयुक्त आणि अधीक्षकांना दिले आहे. या नव्या बेस बॉल टोपीचा खर्च गणवेश अनुदानातून दिला जाणार आहे.
डोक्यात घातल्यानंतर टोपीची पकड घट्ट आणि बंदोबस्तात असल्यानंतर पडणार नाही अशी बेस बॉल टोपीचा नव्याने समावेश केला आहे. यामुळे राज्यातील सुमारे दीड लाख पोलीस कर्मचार्यांच्या डोक्यावरून जुनी टोपी हद्दपार होऊन आता नवी बेस बॉल टोपी डोक्यावर दिसणार आहे.
