Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘ईडी’च्या भीती पोटी उद्धव ठाकरे अफजल खानाच्या शामियान्यात, धनंजय मुंडेंनी उडवली उद्धव ठाकरेंची खिल्ली

‘ईडी’च्या भीती पोटी उद्धव ठाकरे अफजल खानाच्या शामियान्यात, धनंजय मुंडेंनी उडवली उद्धव ठाकरेंची खिल्ली

पुणे : ईडीच्या भितीमुळे उद्धव ठाकरेंनी भाजपाची युती केली असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेयांच्यावर केला. पार्थ पवार यांच्या प्रचार सभेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी युतीवर कडाडून टीका केली.

विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेना आणि भाजपा नेत्यांनी एकमेकांवर टीका केली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपाध्यक्ष अमित शाह यांची अफजलखानशी तुलना केली होती. याच टीकेचा फायदा घेत धनंजय मुंडे यांनी उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे. शिवसेना हि मराठी माणसांसाठी आहे, त्यामुळे मराठी माणसाने शिवसेनेला मतदान करण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले होते. गांधीनगर येथून अमित शाह यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित होते. त्यावेळी उद्धव अफजल खानाला मुजरा घालून जय गुजरात म्हणून आल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

राज्यातील “ईडा पिडा टाळू दे आणि बळी राज्याचं राज्य येऊ दे” हे फक्त नावापुरत मर्यादित ठेवत उद्धव ठाकरेंनी ईडीच्या भीती पोटी अफजलखानाच्या शामियानात जाऊन मुजरा केल्याची टीका मुंडे यांनी यावेळी केली.

मंत्रीपदाच्या अपेक्षेसाठी शिवसेना कमळाबाईच्या मागे फिरत आहे. एवढी लाचार शिवसेना मी कधीच पाहिली नाही, असा टोला देखील धनंजय मुंडेनी लगावला.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *