भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी, “आज के शिवाजी नरेंद्र मोदी” नावाने केले पुस्तक प्रकाशित
नवी दिल्ली: काल दिल्लीत भाजपचे वरिष्ठ नेते जय भगवान गोयल लिखित “आज के शिवाजी नरेंद्र मोदी” या पुस्तकाचे भाजपच्या नेत्यांहस्ते अनावरण करण्यात आले.
यावेळी भाजपचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी उपस्थित होते. यानंतर ट्विटर पासून सर्व समाजमाध्यमांवर एकंच संताप पसरला. विशेषतः शिवप्रेमींकडून याचा मोठ्या प्रमाणात निषेध करण्यात येत आहे. मराठा क्रांती मोर्चानेही याचा जाहीर निषेध केला आहे.
आज @BJP4Delhi कार्यालय में आयोजित धार्मिक सांस्कृतिक सम्मेलन में मेरे द्वारा मा. श्री नरेन्द्र मोदी जी पर लिखि गई पुस्तक ‘‘आज के शिवाजी – नरेन्द्र मोदी’’ का विमोचन किया गया। @BJP4India @ManojTiwariMP @ShyamSJaju @MaheishGirri @blsanthosh @siddharthanbjp @JPNadda pic.twitter.com/VVCTQKdYFS
— Jai Bhagwan Goyal (मोदी का परिवार) (@JaiBhagwanGoyal) January 11, 2020
