ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘कोडा’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा, तर जेन कॅम्पियन यांना सर्वात्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार
अमेरिकेत लॉस एंजलिस इथं हॉलीवूडच्या थिएटरमधे आज सकाळी ९४वा ऑस्कर पुरस्कार वितरण समारंभ झाला. या शानदार समारंभात किंग रिचर्ड या चित्रपटातल्या भूमिकेसाठी विल स्मिथला त्याच्या कारकीर्दीतला पहिला ऑस्कर पुरस्कार प्रदान केला गेला तर आईज ऑफ टॅमी फाये या चित्रपटाची नायिका जेसिका चस्टेनचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरव झाला. अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस अॅण्ड सायन्सनं १ मार्च ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत प्रदर्शित झालेल्या उकृष्ट चित्रपटांसाठी हे पुरस्कार दिले. कोडा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह तीन ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत. तर ड्युन चित्रपटाला सहा पुरस्कार मिळाले आहेत. द पॉवर ऑफ द डॉग या चित्रपटासाठी जेन कॅम्पियन यांना सर्वात्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार प्राप्त झाला.