यंदाचा वैद्यकीय क्षेत्रातला नोबेल पुरस्कार जाहीर
यंदाचा वैद्यकीय क्षेत्रातला नोबेल पुरस्कार काल घोषित करण्यात आला. अमेरिकेतले वैज्ञानिक हार्वे जे अल्टर आणि चार्ल्स एम राईस, आणि ब्रिटनचे वैज्ञानिक मायकल हॉगटन यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
हेपेटायटीस सी या विषाणूचा शोध लावल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. नोबेल समितीचे अध्यक्ष थॉमस पर्लमन यांनी आज स्टॉकहोम इथं या पुरस्कराची घोषणा केली.