अखेर १० वी, १२वी च्या शिक्षकांची निवडणुकीच्या कामातून झाली सुटका
राज्यातील १० वी आणि १२ वीच्या परीक्षांसाठी नियुक्त केलेल्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्यात आले आहे यामुळे १० वी आणि १२ वीच्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. १० वी आणि १२ वीच्या परीक्षेसंबंधित जबाबदारी असलेल्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्यात आदेश निवडणूक अधिकारी अ. ना. वळवी यांनी दिले आहेत.
१० वी आणि १२ वी च्या बोर्डाचे पेपर तपासणाऱ्या शिक्षकांना निवडणुकांचे काम देऊ नये, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. परीक्षांसाठी नियामक तसेच परीक्षक म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांना निवडणुकांच्या कामातून वगळले जावे अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली होती. निवडणुकांच्या कामामुळे दहावी आणि बारावीचे निकाल लांबण्याची भीती होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
