Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

जाणून घ्या कोकणातील ना. म. जोशी शाळेच्या ‘साठी’ उलटलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या अनोख्या उपक्रमाबद्दल

• वरिष्ठ नागरिकांचे आपल्या शिक्षकांना आदरांजली वाहणारे ई-बुक :

• रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथे ना. म. जोशी विद्याभवनात १९७० पूर्वी शिकलेल्या विद्यार्थ्यांचा आधुनिक उपक्रम :

तब्बल पन्नास वर्षांपूर्वी, म्हणजेच १९७० पूर्वी ज्या शिक्षकांनी आपल्याला रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथे ना. म. जोशी विद्याभवनात (इयत्ता अकरावीपर्यंत) शिकविले, त्यांच्याविषयीचे आदरपूर्ण लेख, छायाचित्रे, आठवणी, काव्य इत्यादींचा समावेश असणारे ‘पन्नास वर्षांपूर्वीच्या ना. म. जोशी विद्याभवनातील माझे सर आणि बाई’ अशा नावाचे नवीन तंत्रातील ई-बुक प्रकाशित करण्याचे या ‘साठी’ ओलांडलेल्या माजी विद्यार्थ्यांनी ठरविले आहे. तसे त्यांनी उपलब्ध माध्यमांद्वारे १९७० पूर्वी ना. म. जोशी विद्याभवनात विद्यार्जन केलेल्या वरिष्ठ नागरिकांना कळविण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी, हिंदी अथवा इंग्रजी भाषेमधील असे लेख इत्यादी युनिकोड फॉन्ट वापरून kamatvasudhav@gmail.com (9821310081) अथवा jaiprakash_sawant@rediffmail.com (7021257363) या इमेल आयडी वर ३१ जुलै पूर्वी पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गुरुजनांना शब्दपुष्पांजली वाहण्याचा हा वरिष्ठ नागरिकांचा उपक्रम निश्चितच स्वागतार्ह आहे. आभासी तंत्रांनी जगण्याचा वस्तुपाठ देणारा आहे .

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *