नितेश राणे यांच्या मार्गात गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांचा अडथळा; उमेदवारीस तीव्र विरोध
सिंधुदुर्ग: भाजपने कोकणातील आपल्या कोट्यातील कणकवली विधानसभा मतदारसंघातून नारायण राणे याचे पुत्र नितेश राणे यांना उमेदवारीचा अधिकृत एबी फॉर्म दिला. पण यावेळी त्यांचा जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम न करता हे सारं भाजपने गाजावाजा न करता केलं.
पण आता जिल्ह्यातील दिग्गज नेते राणे यांचे कट्टर प्रतिस्पर्धी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी त्यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केला आहे. कोणत्याही परिस्थिती त्यांना उमेदवारी देऊ नये एकवेळ दुसरा कोणताही उमेदवार घोषित करावा असे त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितले आहे. नारायण राणे आपल्या मुलाच्या उमेदवारी साठी जंग जंग पछडात आहेत पण त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसाठी काय केले असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
एकूणच जर नितेश राणे भाजपच्या तिकिटावर कणकवली मतदारसंघातून निवडणूक लढवत असतील तर त्यांना शिवसेनेच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागेल. त्याला कारणही तसेच आहे. येथे शिवसेना अपक्ष उमेदवाराला साथ देऊ शकते आणि यांचा थेट परिणाम नितेश राणे यांच्या निकालावर पडू शकतो.
