पार्थ पवार म्हणजे लंबी रेस का घोडा – नितेश राणे
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू व अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी पहिल्यांदाच केलेल्या भाषणाची सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून खिल्ली उडवली जात आहे. त्यातच काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी मात्र पार्थ यांची बाजू घेतली आहे.
आमदार नितेश राणे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून नेटकऱ्यांवर टीका केली. नितेश राणे आपल्या ट्विटमध्ये असे म्हणतात की, पार्थ पवार च्या पहिल्या भाषणवार खिल्ली उडवण्यापेक्षा त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. पहिले भाषण आणि मोठी गर्दी…धाडस लागते.
पार्थ लंबे रेस का घोडा है..याद रखना!!, अशा शब्दात नितेश राणे यांनी पार्थ पवार यांच्याविषयी आपले मत सोशल मीडियावर व्यक्त केले आहे.
पार्थ पवार च्या पहिल्या भाषणवार खिल्ली उडवण्यापेक्षा त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे..
पहिले भाषण आणि मोठी गर्दी..
धाडस लागतो!
लंबे रेस का घोडा है..याद रखना!!— Nitesh Rane (@NiteshNRane) March 19, 2019
