Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मुकेश अंबानी यांच्यामुळे अनिल अंबानी यांची जेलवारी टळली

RELIANCE COMMUNICATIONS

मुकेश अंबानी यांच्यामुळे अनिल अंबानी यांची जेलवारी टळली

रिलायन्स कम्युनिकेशन्स विरोधात एरिक्सन इंडियाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. एरिक्सनचे ५५० कोटी व्याजासह परत करण्यास मुकेश अंबानी यांनी मदत केल्यामुळे, अनिल अंबानींची हि जेलवारी मोठ्या भावाच्या कृपा दृष्टीमुळे टळली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपण्यापूर्वी रिलायन्स कम्युनिकेशन्सने एरिक्सनला ४५८.७७ कोटी रुपये दिले. हे पैसे देण्यासाठी मदत केल्यामुळे अनिल अंबानी यांनी मोठा भाऊ मुकेश अंबानी आणि वाहिनी नीता अंबानी यांचे आभार मानले आहेत. कठीण प्रसंगात त्यांनी मला साथ दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असे अनिल अंबानी यांनी म्हटले आहे.

कठीण प्रसंगी मुकेश आणि वाहिनी मला मदत केल्यामुळे मी व माझे कुटुंब त्यांचे मनापासून आभार मानतो. आम्ही जुन्या गोष्टी विसरुन आता पुढे जात आहोत. त्यांच्या या वागणुकीमुळे मी खरंच प्रभावित झालो आहे, असे अनिल अंबानी यांनी म्हटले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *