Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंती निमित्त फिल्म्स डिव्हिजन कडून माहितीपटांचे प्रसारण

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंती निमित्त फिल्म्स डिव्हिजन कडून माहितीपटांचे प्रसारण

देशभक्तीचे खरे प्रतीक आणि महान स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त २३ जानेवारी २०२२ रोजी फिल्म्स डिव्हिजन, नेताजींचे जीवन, अदम्य साहस आणि देशाप्रति निःस्वार्थ सेवा यावर आधारित दोन माहितीपट दाखवून त्यांना आदरांजली वाहत आहे. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ चा एक भाग म्हणून नेताजींच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून हे खास माहितीपट दाखवले जाणार आहेत. फिल्म्स डिव्हिजनचे संकेतस्थळ आणि यूट्यूब चॅनलवर हे चरित्रपट २४ तास प्रसारित केले जातील.

दाखवण्यात येणारे चित्रपट आहेत: द फ्लेम बर्न्स ब्राइट (१९७३/आशिष मुखर्जी) आणि नेताजी (१९७३/अरुण चौधरी), यामध्ये या महान नेत्याचे जीवन आणि ब्रिटिश राजवटीच्या जोखडातून भारताला स्वतंत्र करण्यासाठी त्यांनी दाखवलेले शौर्य आणि अथक लढा यांचे दर्शन घडते. ‘नेताजी’ या चित्रपटात नेताजींची भाषणे वापरण्यात आली असून, त्यांच्या आवाजाशी सुसंगत आहेत.

हे प्रेरणादायी चित्रपट पाहण्यासाठी कृपया https://filmsdivision.org/  वर लॉग ऑन करा आणि @ “Documentary of the Week” वर क्लिक करा किंवा फिल्म्स डिव्हिजन युट्यूब चॅनल https://www.youtube.com/user/FilmsDivision  फॉलो करा.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *