Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नीरज चोप्राची सुवर्णवेध कामगिरी; लुसान डायमंड लीग स्पर्धा जिंकत रचला इतिहास

नीरज चोप्राची सुवर्णवेध कामगिरी; लुसान डायमंड लीग स्पर्धा जिंकत रचला इतिहास

टोकियो ऑलिम्पिक्समधे भालाफेकीत सुवर्णपदक पटकावलेल्या नीरज चोप्राने प्रतिष्ठेची लुसान डायमंड लीग स्पर्धा जिंकत इतिहास रचला आहे. ८९ पूर्णांक ०८ मीटर लांब भाला फेकत अजिंक्यपद मिळवलं. या स्पर्धेत अजिंक्य ठरलेला तो पहिला भारतीय आहे. या कामगिरीमुळे तो २०२३ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी नीरजचं ट्विटरवरून अभिनंदन केलं आहे. कोणाचं लक्ष नसताना त्यानं तयारी केली, नियोजन केलं आणि मेहनतीचं फळ त्याला मिळालं, असं ठाकूर म्हणाले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *