Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

शरद पवार यांनी नातू रोहित पवार यांच्यावर सोपविली महत्वाची जबाबदारी

सुप्रिया सुळे यांच्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराची धुरा सांभाळणार आ. रोहित पवार

पुणे, दि. २८: राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाने बारामती लोकसभा मतदारसंघातून अद्याप जाहीररीत्या सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहिर केली नसली तरी त्यांच्या प्रचाराला एव्हाना सुरुवात झाली आहे. सुप्रिया सुळे यांना पुनःस्च्छ लोकसभेवर पाठवण्यासाठी शरद पवार गट सज्ज झाल्याचे दिसते. शरद पवार यांनी त्यांचा नातू आमदार रोहित पवार यांची बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. या मतदारसंघातून सुप्रिया सुळे या खासदार आहेत. अजित पवार गटाचा राष्ट्रवादीचा उमेदवार महायुतीकडून रिंगणात उतरवला जाणार असून, शक्यतो अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा या उमेदवार असू शकतात, असे मानले जात आहे. परंतू, ऐन वेळेला भाजप एकतर स्वपक्षाच्या तिकिटावर किंवा अजित पवार गटाकडून महादेव जानकर यांना तिकीट देऊ शकते. अशा परिस्थितीत हि निवडणूक चुरशीची होऊ शकते.

सुप्रिया सुळे यांच्या सारथ्याची जबाबदारी शरद पवार यांनी नातू रोहित पवार यांच्या खांद्यावर टाकल्यामुळे भविष्यात विधानसभा निवडणुका २०२४ मध्ये त्यांना सबंध राज्यभर प्रचार यंत्रणा राबविण्यास मदत होईल.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *