Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याबाबत करण्यात आलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली

अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याबाबत करण्यात आलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली

नवी दिल्ली, दि. २८: अबकारी धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक झाल्यानंतर आप नेते अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली.

मुख्य न्यायाधीश मनमोहन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या प्रकरणाच्या निकषाबाबत भाष्य करण्यास नकार दिला, कारण ते न्यायालयीन हस्तक्षेपाच्या कक्षेबाहेर आहे. खंडपीठात समावेश असलेल्या न्यायमूर्ती मनमीत पीएस अरोरा यांनी सांगितले की, “सरकारच्या इतर शाखांनी कायद्यानुसार तपासणी करणे आवश्यक आहे.”

सुनावणीदरम्यान, न्यायालयाने याचिकाकर्ते सुरजित सिंह यादव यांच्या वकिलांना अरविंद केजरीवाल यांच्या मुख्यमंत्रीपदी कायम राहण्याबाबत कायदेशीर अडथळा दाखवण्यास सांगितले. “व्यावहारिक अडचणी असतील पण ती वेगळी बाब आहे. यात कायदेशीर अडचण कुठे आहे?” असे न्यायालयाने विचारले.

आम आदमी पार्टी (आप) चे राष्ट्रीय संयोजक, अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांची २८ मार्चपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत त्यांची रवानगी केली होती.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *