राष्ट्रवादीचा आणखी एक आमदार परतला पण त्यांची भाजप प्रेमाची जुनी पोस्ट फेसबुकवर तशीच
अंमळनेर: काल सकाळी राष्ट्रवादितून बंडखोरी करत काळजीवाहू उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीला हजर राहिलेला अजून एक आमदार परत आल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अंमळनेर चे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी काल एक फेसबुक पोस्ट लिहीत आपण राष्ट्रवादीसोबत असल्याचे जाहीर केले.
कालच्या घटनाक्रमाबद्दल स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, “मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबरच आहे, माझा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास आहे, मा.अजितदादा पवार हे गटनेते असल्याने त्यांच्या सांगण्यावरून मी इतर आमदारांसोबत राजभवनात गेलो होतो तिथे काय होणार आहे या बाबत कोणतीही कल्पना नव्हती, मी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात नाही ! कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये !”
राजकारणात असंतुष्ट एक पक्षातून दुसऱ्या पक्षात बेडूक उड्या मारतच असतात. गमतीचा एक भाग असा की आम्ही जेव्हा अनिल पाटील यांच्या जुन्या पोस्ट पहिल्या त्यात एका प्रोफाईल फोटो मध्ये “BJP is Best” अशी एक पोस्ट आम्हाला आढळली. बहुतेक हेच भाजप बद्दलच प्रेम त्यांना त्या दिशेने ओढून तर नेलं नसावं ना?

