नवाब मलिकांचे विनोद तावडेंवर टीकास्त्र
मुंबई: जो माणूस स्वतः बारावी पास नाही, ज्या माणसाला कागद वाचता येत नाही त्या माणसाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर बोलण्याचा काहीच अधिकार नाही, अशी जोरदार टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडेंवर केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा बालीश आहे, अशी टीका शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी (२८ मार्च) केली होती. विनोद तावडे यांनी केलेल्या टीकेवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज सडेतोड उत्तर दिले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार सामना पाहावयास मिळत आहे.
