Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

लवकरच ‘हा’ मराठमोळा अभिनेता दिसणार एका जर्मन चित्रपटात आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत

लवकरच ‘हा’ मराठमोळा अभिनेता दिसणार एका जर्मन चित्रपटात आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत

अभिनेता संतोष जुवेकर सध्या आपल्या इंटरनॅशनल प्रोजेक्टच्या तयारीत व्यस्त आहे. एप्रिल महिन्यापासून मराठमोळा संतोष एका जर्मन फिल्ममध्ये काम करणार आहे.

असे कळते की ह्या जर्मन चित्रपटाचे नाव ‘डिसोनन्स’ असे आहे. डिसोनन्स ही सायन्स फिक्शन फिल्म आहे. ह्या चित्रपटामध्ये संतोष जुवेकर ‘पिटर’ या आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे.

या भूमिकेसाठी संतोषने गेले काही महिने आपल्या शरीरयष्टीवर प्रचंड मेहनत घेतली. योग्य आहार आणि जिम ट्रेनिंगव्दारे त्याने आर्मी ऑफिसरसारखा फिटनेस मेंन्टेन केला आहे. संतोष आर्मीचा बारकाईने अभ्यास करत आहे. सध्या एका जर्मन शिक्षकांकडून तो जर्मन भाषेचे प्रशिक्षण घेत आहे.

आर्मीत जवानांना शारीरिक शिक्षणासोबतच मानसिक शिक्षणही दिले जाते. त्यांच्या मेन्टल फिटनेसची परीक्षा घेताना त्यांच्यासोबत अनेक माइंड गेमही खेळले जातात. त्यांना मानसिकदृष्ट्याही सक्षम करण्यासाठी मेन्टली थर्ड डिग्री ट्रेनिंग देण्यात येते. आर्मीच्या संपूर्ण घडामोडीनावर हा सिनेमा आधारित आहे. अशी माहिती संतोषने प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *