Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नवी मुंबईतील शाळेत झालेल्या १४ मुलींच्या विनयभंग प्रकरणाची गंभीर दखल घेण्याचे डॉ.नीलम गोऱ्हे यांचे पोलिसांना निर्देश

नवी मुंबईतील शाळेत झालेल्या १४ मुलींच्या विनयभंग प्रकरणाची गंभीर दखल घेण्याचे डॉ.नीलम गोऱ्हे यांचे पोलिसांना निर्देश

मुंबई : दिनांक २८ फेब्रुवारीच्या विविध वृत्तपत्रांमध्ये नवी मुंबईतील शाळेतील संगणक प्रशिक्षकाने १४ मुलीचा विनयभंग केल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे. या घटनेबाबत सोशल मीडियावर ही व्हिडिओ क्लिप फिरत आहे. याची गंभीर दखल विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली असून संबंधित संगणक प्रशिक्षकास अटक करून योग्य ती चौकशी करण्याच्या सूचना नवी मुंबई पोलीस प्रशासनास दिल्या आहेत.

याबाबत डॉ. गोऱ्हे यांनी पोलीस आयुक्त नवी मुंबई यांना सविस्तर पत्र लिहिले असून त्यामध्ये समुपदेशक यांनी आपली कर्तव्य योग्य रित्या पार पडली का, शाळेत सीसीटीव्ही बसवले आहेत का, शाळेत विशाखा समिती नेमण्यात आली आहे का, या बाबतही चौकशी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सदर आरोपीस पोस्को कायदा व आयपीसी कलम १२० अंतर्गत कारवाई करण्याचा सूचनाही डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *