Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नवी मुंबई, पनवेल परिसरातील अपंग, सैनिक व रुग्णांना मोफत रिक्षासेवा देणारा अवलिया कोकणातील पूरग्रस्ताच्या मदतीलाही हजर

पंकज शर्मा या सर्वसामान्य रिक्षा चालकाकडूनही पूरग्रस्तांना मदतीचा हात

नवी मुंबई, दि.३१(विठ्ठल ममताबादे): कळंबोली येथील रहिवाशी पंकज रामशंकर शर्मा हे सर्वसामान्य रिक्षाचालक आहेत. परंतु त्यांचे कार्य हे समाजासाठी खूपच प्रेरणादायी आहे. नवी मुंबई, पनवेल परिसरात अपंग, आजी-माजी सैनिक आणि असहाय्य रुग्णांना कायस्वरूपी ते मोफत रिक्षा सेवा देतात. या साऱ्यांकडून ते कधीच प्रवासाचे पैसे घेत नाहीत. संबंध नवी मुंबई मध्ये अशी सेवा देणारे ते एकमेव रिक्षाचालक आहेत. समाजाची ते रात्रंदिवस २४ तास सेवा करत असल्याने त्यांचा कोरोना योद्धा म्हणून अनेक जणांनी सत्कार केला आहे. आजच्या धकाधकीच्या व जीवघेण्या स्पर्धेच्या युगात माणुसकी लोप पावत चालली आहे. मात्र दुसरीकडे माणुसकी जिवंत ठेवणाऱ्या अशा प्रकारच्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून पंकज शर्मा यांच्या समाजसेवी वृत्तीचे जनतेने कौतुक होत आहे.

आर्मी लव्हर म्हणून परिचित असलेले पंकज शर्मा यांचे लष्करात सामील होऊन देशाची सेवा करण्याचे स्वप्न होते परंतु ते पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे अपंग, आर्मी, हॉस्पिटल मधील रुग्णांना रिक्षाद्वारे कायमस्वरूपी मोफत प्रवास सेवा देऊन देशसेवा करण्याचा संकल्प त्यांनी केला. तेव्हापासून आजपर्यंत व पुढेही हा उपक्रम चालू ठेवणार असल्याचे पंकज शर्मा यांनी सांगितले. अपंग, आजी-माजी सैनिक, हॉस्पिटल मधील रुग्ण यांनी मोफत प्रवासासाठी पंकज शर्मा यांच्या 7039539956 या फोन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

नुकताच रायगड जिल्ह्यात महाड व पोलादपूर तालुक्यात पूर आला होता. त्यांना मदतीसाठी सामान, वस्तू गोळा करण्याचे कार्य करणाऱ्या पनवेल, नवी मुंबई मधील संस्था, संघटना यांचे पूरग्रस्तांसाठीचे सामान रिक्षातून टेम्पो मध्ये शिफ्ट करण्याचे काम फ्री मध्ये, कोणताही मोबदला न घेता ते करत आहेत. वैयक्तिकरित्या श्रमदान करून तसेच आपली ऑटो रिक्षा कामाला लावून ते सेवा बजावत आहेत. शिवाय तेही कोणतेही अपेक्षा न बाळगता. आता पूरग्रस्तांचे जीवनावश्यक सामान बिल्डिंग मधून टेम्पो मध्ये किंवा एका परिसरातून दुसऱ्या परिसरात सामान पोहोचविण्याचे कामही सामाजिक बांधिलकीतून ते पार पाडत आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *