Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

बहुप्रतिक्षित नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी जाहीर

बहुप्रतिक्षित नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी जाहीर

आज नवी मुंबई स्पोर्ट्स क्लब, वाशी येथे प्रेस कॉन्फरन्स मध्ये काँग्रेस चे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांच्या अध्यक्षतेत नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यावेळी नवी मुंबई महानगर पालिकेच्या उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, काँग्रेस नेते संतोष शेट्टी, परिवहन सभापती रामचंद्र दळवी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्षा सुदर्शना कौशिक, शार्दूल कौशिक, नवी मुंबई कॉंग्रेस कमिटीतील नवनिर्वाचित पदाधिकारी, ज्येष्ठ काँग्रेस नेते, कार्यकर्ते तसेच पत्रकार उपस्थित होते.

गेले बरेच दिवस ह्या पदांवरील नेमणुकांबद्दल सस्पेन्स होता. नवी मुंबईतील बरेच काँग्रेस कार्यकर्ते कार्यकारिणीत येण्यासाठी इच्छुक होते. नवी मुंबईचे माजी उप-महापौर राहिलेल्या अनिल कौशिक यांनी कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेऊन तसेच ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांच्या सल्ल्याने ह्या नेमणूक केल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *