Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

सॅल्युट! नवी मुंबई पोलिसांनी वाचवले आत्महत्या करू पाहणाऱ्या तरुणीचे प्राण

नवी मुंबईतील वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

वाशी/नवी मुंबई: नवी मुंबईतील वाशी येथील सेक्टर १७ मधील जय जवान सोसायटी येथे एका इमारतीच्या पाण्याच्या टाकीवरून उडी मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या २० वर्षीय महिलेला वाशी पोलिसांनी रविवारी वाचवले.

या इमारतीच्या बाजूने जाणाऱ्या पदाचाऱ्याने महिलेला पाण्याच्या टाकीवर उभे पाहिले आणि पोलिस नियंत्रण कक्षाला सतर्क केले. यानंतर वेळीच बीट मार्शल आणि अग्निशमन दलाची टीम घटनास्थळी दाखल झाली. यावेळी वाशी पोलिसांच्या अमृत साळी, रुमटे, ठाकूर व इतर यांनी या मुलीस वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

या संबंध घटने प्रकरणी माहिती देताना वाशी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन ढगे म्हणाले की, “काही कर्मचार्‍यांनी तिला पाण्याच्या टाकीवरुन खाली जाण्यासाठी पटवून देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी पाण्याच्या टाकीच्या मागे जाण्यासाठी प्रयत्न केले. याच वेळी योग्य संधी मिळताच पथकाने महिलेला नकळत पकडले आणि तिला आत्महत्या करण्यापासून रोखले.”

वाशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेला अमली पदार्थांचे व्यसन होते व त्याच नैराश्यात तिने आत्महत्या करण्याचा केला. लॉकडाऊन च्या काळात विशेषतः शहरी भागात तरुणांकडून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशाच मनोवस्थेत असलेल्या एका मुलीचे प्राण वाचवल्या बद्दल नवी मुंबई पोलिसांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *