राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकांत दिवसअखेर ९ अंकांची घसरण
मागची चार सत्र तेजीत असलेल्या शेअर बाजारात आज गुंतवणूकदारांनी नफा कमवण्याला प्राधान्य दिल्यामुळे किरकोळ घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांत दिवसअखेर ३९ अंकांची घसरण झाली आणि तो ४१ हजार ६४३ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ९ अंकांनी घसरून १२ हजार २६३ अंकांवर बंद झाला.
(सौजन्य – AIR)
