झारखंड मध्ये मोदी-शहांच्या सभा फेल, झामुमो चे हेमंत सोरेन मुख्यमंत्रीपदी होणार विराजमान
झारखंड: झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून झामुमो-काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं असून भाजप ला पराभव पहावा लागत आहे. महाआघाडीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार हेमंत सोरेन यांनी आपले पिता शिबू सोरेन यांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले.
८१ विधानसभा जागा असलेल्या झारखंड विधानसभेत बहुमतासाठी ४१ जागांची गरज आहे आणि या महाआघाडीने ४४ जागांवर आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. तर भाजप २७ जागांवर स्थिरावल्याचे दिसतेय. बाकी अपक्षांना १० जागा मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांनंतर भाजपला मिळालेला हा मोठा धक्का असल्याचे मानले जाते.