Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

वांद्रे-कुर्ला संकुलातील ‘हुनर हाट’ प्रदर्शनाला भेट दिलीत का?

वांद्रे-कुर्ला संकुलातील ‘हुनर हाट’ प्रदर्शनाला भेट दिलीत का?

मुंबई दि. २२ : ‘हुनर हाट’ हे भारताचे प्रतिकात्मक स्वरुपच आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले.
वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एम एम आर डी ए मैदानावर भारत सरकारच्या अल्पसंख्याक मंत्रालयातर्फे ‘हुनर हाट’ प्रदर्शन भरवण्यात आले आहे. अल्पसंख्याक मंत्रालयाद्वारा आयोजित ‘हुनर हाट’ दस्तकार, शिल्पकारांसाठी ‘एम्पॉवरमेन्ट- एम्प्लॉयमेंट एक्सचेंज’ म्हणून सिद्ध होत आहे. दस्तकार शिल्पकारांना बाजारपेठ देण्यासाठी देशाच्या विविध भागात आयोजित ‘हुनर हाट’ प्रामाणिक आणि विश्वसनीय ब्रँड बनला आहे.

‘हुनर हाट’मध्ये अवधी खाना, राजस्थानी दाल बाटी चुरमा, गुजराती थाळी, महाराष्ट्रीयन व्यंजन, केरळी मलबार फूड, तामिळ व्यंजन, बंगाली मिठाई, सुगंधी पान, ओडिसी सिल्व्हर फिलीग्री उत्पादन, जम्मू काश्मीरची प्रसिद्ध विलो बैट या विशेष खाद्यपदार्थांचा समावेश आहे. प्रदर्शन कालावधीत कव्वाली, सुफी संगीत, नृत्य यांसह अन्य सांस्कृतिक कार्यक्रम ‘हुनर हाट’चे आकर्षण ठरणार आहे.

हे प्रदर्शन दि.२० ते ३१ डिसेंबरपर्यंत सकाळी ११ ते रात्री १० या वेळेत सुरु राहणार असून यामध्ये देशभरातील विविध ठिकाणचे कारागीर, दस्तकार, शिल्पकार सहभागी होणार आहेत. हुनर हाटचे यंदाचे १६ वे वर्ष आहे.

प्रदर्शनाबाबत :

दि. २० ते ३१ डिसेंबर पर्यंत सदर ‘हुनर हाट’ एमएमआरडीए मैदान, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे असणार आहे. प्रदर्शनात देशाच्या विविध भागातील दस्तकार, शिल्पकार, खानसामे सहभागी होणार असून यामध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग असेल. या प्रदर्शनात भारतातील अमूल्य कारागिरीचा उत्तम नमुना असलेले झारखंड सिल्कच्या व्हेरायटी, भागलपुरी सिल्क आणि लिनन, लाख वापरून तयार केलेले पारंपरिक दागिने, पश्चिम बंगालचा काथा, वाराणसी सिल्क, लखनवी चिकन करी, उत्तर प्रदेशचे सिरॅमिक, टेराकोट्टा, काचेच्या वस्तू, पितळी भांडी, चामडे, संगमरवरी वस्तू, आंध्र प्रदेशातील कलमकारी, मंगलगिरी आणि मोत्यांचे दागिने, गुजरातचे अजरख, तांब्याच्या घंट्या, पतियाळाची फुलकारी आणि जुत्ती, मध्य प्रदेशचा बाटिक, बाघ, चंदेरी, महेश्वरी, जम्मू काश्मीरमधील होम फर्निशिंग, तांब्याची भांडी आणि हँडलूम, राजस्थानी स्वदेशी हँडिक्राफ्ट आणि हँडलूम पाहण्यासाठी व विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *