नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलावास सुरुवात परंतु, काही बाजार समित्यांत गोंधळाची स्थिति
नाशिक, दि. १०: कांदा निर्यात शुल्क कमी करण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी गेल्या २० सप्टेंबरपासून नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी पुकारलेलं लिलाव बंद आंदोलन अखेर मागे घेतलं आहे. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत काल व्यापारी प्रतिनिधींची बैठक झाली; यावेळी व्यापाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात महिनाभरात निर्णय घेण्याचं आश्वासन मंत्र्यांनी दिलं; त्यानंतर व्यापाऱ्यांनी लिलाव बंद मागे आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आजपासून जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये लिलाव पुन्हा सुरू झाले आहेत. सकाळपासून काही बाजार समित्यांमध्ये गोंधळाची स्थिति असली तरी नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव सुरू झाल्याचे चित्र सध्यातरी पाहायला मिळत आहे.