Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘पानिपतकार’ विश्वास पाटील यांच्या हस्ते होणार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन

‘पानिपतकार’ विश्वास पाटील यांच्या हस्ते होणार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन

नाशिक: नाशिक इथं होणाऱ्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन प्रख्यात साहित्यिक विश्वास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली. नाशिक शहराजवळ आडगाव इथल्या भुजबळ नॉलेज सिटीमधे संमेलनस्थळाचं भूमीपूजन नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार उपस्थित होत्या. संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह गीतकार जावेद अख्तर उपस्थित राहणार आहेत, तर समारोप सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर उपस्थित राहणार आहेत, असं त्यांनी सांगितलं. यावेळी संमेलनाच्या तयारीची माहितीही भुजबळ यांनी दिली.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *