Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘मैं भी चौकीदार’ म्हणत मोदींनी केली प्रचार मोहीमेला सुरुवात

NAMO TWEET

‘मैं भी चौकीदार’ म्हणत मोदींनी केली प्रचार मोहीमेला सुरुवात

२०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जवळ येताच सर्व पक्षांमध्ये प्रचाराची जुगलबंदी सुरु झाली आहे. त्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट करत भाजप पक्षाच्या प्रचार मोहिमेला सुरुवात केली आहे. या मोहिमेतर्गंत ते ३१ मार्च रोजी देशभरातील जनतेशी संवाद साधणार आहेत. असे आवाहन त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.
पंतप्रधान मोदी आपल्या ट्वीट मध्ये म्हणतात की, आपला चौकीदार देशाच्या सेवेसाठी भक्कमपणे उभा आहे. पण मी एकटा नाही. प्रत्येकजण जो भ्रष्टाचार आणि समाजातील वाईट गोष्टींविरोधात लढा देत आहे; तो चौकीदार आहे. जो देशाच्या प्रगतीसाठी काम करत आहे; तो चौकीदार आहे. आज प्रत्येक भारतीय म्हणत आहे-#MainBhiChowkidar.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *