महाराष्ट्रात सभा घेण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले मराठीत ट्विट
निवडणूक जवळ येताच राज्यात सर्वच पक्ष मोठ्या उत्साहाने प्रचाराची जोरदार तयारी करत आहे. लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात आठ प्रचारसभा होणार आहे. मोदी यांची पहिली सभा आज वर्धा येथे असून या पार्श्वभूमीवर मोदींनी सकाळी मराठीतून ट्विट केले आहे.
“महाराष्ट्रातील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींना नमस्कार, आज मी महाराष्ट्राला भेट देणार आहे. महात्मा गांधीजी यांच्या जीवनदर्शनाची साक्ष देणाऱ्या वर्ध्यात संवाद साधणार आहे”, असे त्यांनी पहिल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दुसऱ्या ट्विटमध्ये, “केंद्र आणि राज्य सरकारने जी लोकाभिमुख कामे केली, त्यातून महाराष्ट्रातील जनता पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना-रिपाई(आठवले गट) महायुतीला भक्कम आशीर्वाद देतील, हा मला विश्वास आहे”, असे मोदींनी म्हटले आहे.
दरम्यान, मोदी ३ एप्रिल रोजी गोंदिया येथे प्रचार सभा घेणार असून राज्यातील शेवटची प्रचारसभा ते मुंबई घेणार आहे.
महाराष्ट्रातील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींना नमस्कार!
आज मी महाराष्ट्राला भेट देणार आहे. महात्मा गांधीजी यांच्या जीवनदर्शनाची साक्ष देणाऱ्या वर्ध्यात संवाद साधणार आहे.
— Narendra Modi (@narendramodi) April 1, 2019
