Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नारायणगावात तमाशाचे फड पून्हा रंगण्यास सुरुवात

नारायणगावात तमाशाचे फड पून्हा रंगण्यास सुरुवात

पुणे: तमाशा पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याजवळील नारायणगाव इथं नवीन मराठी वर्षारंभाच्या निमित्तानं गावोगावचे तमाशा फड डेरेदाखल झाले असून कोरोनाविषयक सर्व निर्बंध दूर झाल्यानं यंदाचा हंगाम समाधानकारक जाईल असा विश्वास फड चालकांकडून व्यक्त होत आहे.
गुढीपाडव्यापासून सुरु होणाऱ्या सणासुदीच्या हंगामात नारायणगावातील तमाशा फडांना अनेक छोट्या मोठ्या गावातून वाढती मागणी असते आणि त्यासाठीच पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातूनही तमाशाचे फड इथं येत असतात. गेल्या २ वर्षांपासून कोरोना निर्बंधांमुळं या लोककलावंतांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली होती मात्र सुदैवानं यंदा ऐन हंगामात कोरोनाचे निर्बंध हटले असून गावोगावचे तमाशा फड नारायणगावात दाखल होऊ लागले आहेत.

या फडांमधून सर्वसाधारणपणे २० ते २५ जणांपासून तब्बल २०० ते २५० कलाकारांचाही समावेश असतो. कलावंतांच्या संख्येनुसार या छोट्या मोठ्या फडांना एका कार्यक्रमासाठी ६० हजार रुपयांपासून दीड ते दोन लाख रुपयांपर्यंतची सुपारी मिळत असते. गेल्या दोन वर्षांच्या कठीण काळानंतर येणाऱ्या काळात या लोककलावंतांची विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा नीट बसेल असा विश्वास यानिमित्तानं व्यक्त होऊ लागला आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *