नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा
मुंबई, दि.४: विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी थोड्याच वेळापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपावला असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष होण्याचा आता त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
काल त्यांनी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली होती. आता विधानसभा अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.