निवडणुकीच्या प्रचारासाठी नाना पाटेकरांच्या फोटोंचा होतोय गैरवापर
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचाराला जोमाने सुरुवात झाली आहे. या निवडणूकीच्या काळात मराठी अभिनेते नाना पाटेकर यांच्या नावानेही अनेक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यासंदर्भात स्वतः नानांनीच ट्विट करुन आपले मत मांडले आहे.
नाम फाऊंडेशनच्या कामानिमित्त गावोगावी फिरताना अनेक लोक भेटायला येतात आणि पुष्पगुच्छ देऊन फोटो काढतात. काही मंडळी अशा फोटोंचा गैरवापर करीत आहेत. मी कुठल्याही राजकीय पक्षाचा नाहीं. कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही. अशा शब्दात नानांनी आपले मत ट्विटर वर व्यक्त केले आहे.
नानांनी ट्विटद्वारे आपले मत व्यक्त करून खोट्या प्रचाराला बळी न पडण्याचे आवाहन राज्यातील जनतेला केले आहे.
नाम फाऊंडेशनच्या कामा निमित्त गावोगावी फिरताना अनेक लोक भेटायला येतात आणि पुष्पगुच्छ देऊन फोटो काढतात. काही मंडळी अशा फोटोंचा गैरवापर करीत आहेत.
मी कुठल्याही राजकीय पक्षाचा नाहीं.
कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही.— Nana Patekar (@nanagpatekar) April 3, 2019
