एन. व्ही. रमणा यांची सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश म्हणून निवड
नवी दिल्ली, दि.६: सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश म्हणून नुथलापती वेंकट रमणा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज रमणा यांच्या नावाची घोषणा केली. रमणा हे ४८ वे सरन्यायाधीश म्हणून पुढील वर्षाच्या २६ ऑगस्टपर्यंत कार्यभार सांभाळतील.
मावळते सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी रमणा यांच्या नावाची शिफारस राष्ट्रपतींकडे केली होती. आंध्र प्रदेशातल्या शेतकरी कुटुंबातून आलेले रमणा यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम पाहिलं आहे.
