Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील यांची बिनविरोध निवड

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील यांची बिनविरोध निवड

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. रोजगार हमी योजना तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी अध्यक्षपदासाठीचा अर्ज मागे घेतल्यानं, नितीन पाटील यांची बिनविरोध निवड झाली.

ग्रामविकासमंत्री अब्दुल सत्तार यांचे समर्थक सिल्लोडचे अर्जुन गाढे हे उपाध्यक्षपदी विजयी झाले. उपाध्यक्षपदासाठी कृष्णा पाटील डोणगावकर, दिनेश परदेशी, अर्जुन गाढे, जगन्नाथ काळे, आप्पासाहेब पाटील हे पाच जण निवडणूक रिंगणात होते. गाढे यांना तेरा तर डोणगावकर यांना सात मतं मिळाली.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *