Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत ‘म्युकरमायकोसीस’वरील उपचाराचा समावेश – आरोग्यमंत्री राजेश टोपे

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत ‘म्युकरमायकोसीस’वरील उपचाराचा समावेश – आरोग्यमंत्री राजेश टोपे

योजनेंतर्गत म्युकरमायकोसीसवरील औषधे रुग्णांना मोफत

या आजारावरील उपचारामध्ये अँटीफंगल औषधे हा महत्त्वाचा भाग असून ती कमी प्रमाणात उपलब्ध होत आहेत. त्याचबरोबर ती महाग देखील आहेत. ही औषधे शासनाच्या प्रचलित नियमानुसार विहीत कार्यपद्धती अनुसरून संबंधित प्राधिकरणाकडून उपलब्ध करून घेण्यात यावीत व अंगीकृत रुग्णालयास पात्र लाभार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात यावीत, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.

जिल्हा शल्य चिकित्सक यांचेमार्फत याकामी सनियंत्रण केले जाईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित जिल्हा शल्य चिकित्सक यांची असणार आहे. अंगीकृत रुग्णालयांना खर्चाची प्रतीपूर्ती करण्यापूर्वी सर्व बाबी तपासून अनावश्यक आर्थिक भार पडणार नाही, याची खबरदारी राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *