मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शशिकांत कर्णिक यांचे निधन
मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शशिकांत कर्णिक यांचे काल रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. ते 79 वर्षांचे होते.
डॉ. कर्णिक हे इतिहासाचे प्राध्यापक होते. त्यांनी सहा वर्षे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरूपद भूषविले. एमपीएससीचे अध्यक्ष आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली. डॉ. कर्णिक यांनी बृहत् भारतीय समाज, भारतीय शिक्षा संस्था तसेच धीरूभाई अंबानी फाऊंडेशनच्या विश्वस्तपदीही काम केले आहे.
डॉ. शशिकांत कर्णिक यांच्या मागे पत्नी, मुलगा- सून, नातवंडे असा परिवार आहे.
